गेल्या आठवड्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून माझा पहिला हिंदी चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला. इट्स ब्रेकिंग न्यूज हे त्या चित्रपटाचं नाव. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ इत्यादि वर्तमानपत्रांनी, तरण आदर्श, कोमल नहाता यांच्यासारख्या 'ट्रेडगुरूं'नी या सिनेमाला आपली पावती दिली. तरी काही इंग्रजी दैनिकांनी या चित्रपटावर खूप वाईट शेरे मारले. खलिद महम्मद, ज्यांनी खुर्च्यांना खिळवून ठेवणारे दोन चित्रपट 'तहज़ीब' आणि 'फ़िज़ा' बनवले (म्हणजे खुर्च्या थिएटरला खिळून राहिल्या, लोक मात्र बिचारे उठून गेले), त्यांनी चित्रपट न पाहताच त्यावर समीक्षा लिहिण्याचा विश्वविक्रम ही केला. या चित्रपटामुळे काही पत्रकार दुखावले जाणार याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती. राजीव मसंद यांनी सीएनएन-आयबीएन वर केलेल्या समीक्षेत म्हटलं की दिग्दर्शकाने सिनेमात स्टिंग ऑपरेशन चित्रित करून तोच गुन्हा केलाय् जो स्टिंग ऑपरेशन करणारे पत्रकार करतात. हे म्हणजे एका चित्रपटात एका अभिनेत्रीने वेश्येचं काम केलं तर ती ही वेश्याच आहे, असं म्हटल्यासारखं झालं.
सामान्य लोकांना हा चित्रपट आवडला आहे, हे जाहिर आहे. Yahoo.com, sulekha.com, bharatstudent.com, या संकेतस्थळांवर ही चित्रपटाचे चांगले रिपोर्ट्स आले आहेत. माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी या चित्रपटाची गाणी आणि त्याच्या मागची कथा लिहिली आहे. आपण ही गाणी ऐकून प्रतिक्रिया कळवल्यास मला खूप आनंद होईल.
http://musicandnoise.blogspot.com/2007/10/its-breaking-news-second-song.html
http://musicandnoise.blogspot.com/2007/10/its-breaking-news-first-song.html
http://musicandnoise.blogspot.com/2007/10/it-breaking-news-trailers.htmlLabels: It's Breaking News, माझ्याबद्दल, संगीत, सिनेमा